बेडरूममध्ये देव-देवतांचे फोटो का लावू नयेत? वाचा...

By Harshada Bhirvandekar
Jul 02, 2024

Hindustan Times
Marathi

घरातील बेडरूम कुटुंबासाठी खूप खास असते. वास्तुशास्त्रानुसारच, तुम्ही तुमची बेडरूम सजवणे महत्त्वाचे आहे.

बेडरूममधील वास्तुदोष यामुळे तुमच्या कुटुंबावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट बेडरूममध्ये ठेवण्यापूर्वी तिची दिशा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये एखाद्या देवाचा फोटो ठेवावा की, नाही हे जाणून घेऊया.  

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये देवाचा फोटो लावणे वर्ज्य आहे. यामुळे आपला जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.  

असे मानले जाते की, बेडरूममध्ये देवदेवतांचा फोटो ठेवल्याने पती-पत्नीच्या नात्यात कटूता येऊ शकते. 

पण, तरीही या खोलीत देवाचे चित्र लावायचे झाल्यास वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच लावावे. 

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावू शकता. राधा-कृष्णाचा फोटो खोलीत लावणे शुभ मानले जाते.  

मात्र, या फोटोत एकटी राधा किंवा एकटा कृष्ण असू नये, हेही लक्षात ठेवा. फोटो हा जोडीचाच असावा.

ज्योतिषशास्त्रात, बेडरूमचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. त्यामुळे जिथे शुक्र ग्रह असतो तिथे देवी-देवतांची उपस्थिती म्हणजेच गुरु ग्रहाची उपस्थिती अशुभ मानली जाते.

सचिनच्या लेकीचा रॉयल लुक, पाहा ग्लॅमरस फोटो