घरात नेमका कुठे लावावा भगवान शंकराचा फोटो?

By Harshada Bhirvandekar
Jul 22, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की, घरात लावण्यात येणाऱ्या फोटोंमुळे घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या देवी देवतांचे फोटो घरात नेमके कुठे लावावे... 

असे मानले जाते की, जर भगवान शिवाची कृपा असेल तर पापी ग्रह देखील आपला प्रभाव दाखवू शकत नाही आणि आपल्या मार्गातील मोठे अडथळे दूर होतात.  

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये भगवान शंकराचा फोटो लावताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.  

शक्यतो घराच्या उत्तर दिशेलाच भगवान शंकराचा फोटो ठेवावा.

भगवान शंकराचा फोटो असा असावा की, त्यात ते शांत बसून ध्यानमग्न असतील.  

याशिवाय तुम्ही नंदीवर बसलेल्या भगवान शिवाचा फोटो देखील लावू शकता. 

मात्र, घरात नटराजाची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. यामध्ये भगवान शंकराचे तांडव रूप दिसते. 

वास्तूनुसार, घरामध्ये लावण्यात येणारा भगवान शंकराचा फोटो त्यांच्या कुटुंबासोबत असेल, तर तो अतिशय शुभ मानला जातो.

इंग्रजीतले 'हे' ६ शब्द बनवतील तुम्हाला प्रोफेशनल!