वास्तुशास्त्राप्रमाणे फेंगशुईमध्ये देखील अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आपल्या वास्तूत निर्माण होणारे दोष दूर करण्यासाठी काही उपाय आहेत. ‘लाफिंग बुद्धा’ हा त्यापैकीचं एक आहे.
असे मानले जाते की, लाफिंग बुद्धा समृद्धी आणि आनंद देतो. लाफिंग बुद्धा एखाद्याला भेट देणे शुभ मानले जाते.
चीनमध्ये लाफिंग बुद्धाची देवता म्हणून पूजा केली जाते. त्याची मूर्ती घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धी येते, असं देखील म्हटलं जातं.
चीनमध्ये लाफिंग बुद्धाला संपत्तीचा दाता म्हणतात. चिनी मान्यतेनुसार, जपानचे होतेई हे महात्मा बुद्धांच्या अनेक शिष्यांपैकी एक होते.
जेव्हा होतेई यांनी बौद्ध स्वीकारला आणि त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, तेव्हा ते जोरात हसायला लागले.
तेव्हापासून त्यांनी लोकांना हसवणे आणि आनंदी ठेवणे, हेच आपल्या आयुष्यात ध्येय बनवले.
असे मानले जाते की, ज्या ठिकाणी लाफिंग बुद्धा असतो, त्या ठिकाणी पैसा आपोआप आकर्षित होतो.
यामुळेच लोक ‘लाफिंग बुद्धा’ची मूर्ती घर, हॉटेल, दुकान आणि ऑफिसमध्ये ठेवतात.
लाफिंग बुद्धा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवू नये. तो, नेहमी दरवाज्यापासून लांब असावा.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान