नवीन वर्षाचे कॅलेंडर घरात कुठे लावावे?

By Priyanka Chetan Mali
Dec 17, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीसाठी वास्तू नियमाचे पालन करणे सुख-समृद्धीदायक मानले गेले आहे. 

नवीन वर्ष २०२५ सुरू होणार आहे, अशात कॅलेंडर लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा.

वास्तूनुसार दिशांना फार महत्व आहे. अशात नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना दिशेनुसार लावा. जाणून घ्या कॅलेंडर लावण्यासंबंधी वास्तू टिप्स.

नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना सर्वात पहिले जुने कॅलेंडर काढून टाका. काहीजण जुन्या कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर लावतात. परंतू, वास्तूनुसार हे चुकीचे आहे.

घराच्या पश्चिम दिशेला नवीन कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, या दिशेला कॅलेंडर लावल्याने घरात धन,सुख-समृद्धीचे आगमन होते.

घराच्या उत्तर दिशेलाही कॅलेंडर लावू शकतात. हिंदू धर्मात उत्तर दिशा कुबेर देवाची मानली जाते. सांगितले जाते की, या दिशेला कॅलेंडर लावल्याने आर्थिक वृद्धी होते.

वास्तूनुसार, दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये. मान्यतेनुसार या दिशेला कॅलेंडर लावल्याने आर्थिक नुकसान होते आणि आरोग्याच्या तक्रारी वाढतात.

वास्तूनुसार, दरवाजाच्या मागे, खिडकीजवळ आणि मुख्य दरवाजाजवळ कॅलेंडर लावणे शुभ मानले जात नाही. मान्यतेनुसार याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.

वास्तूनुसार, भांडण, बुडतं जहाज, महाभारतचे नकारात्मक चित्र असलेले कॅलेंडर लावू नये.

डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

भोजपुरी अभिनेत्रीच्या रेड रिवीलिंग ड्रेसमध्ये मादक अदा