स्वयंपाक घराशी संबंधित दोष दूर करतील ‘हे’ सोपे उपाय!
By
Harshada Bhirvandekar
Jul 23, 2024
Hindustan Times
Marathi
वास्तुशास्त्रात स्वयंपाक घराशी संबंधित अनेक वास्तुदोष सांगितले आहेत, जाणून घेऊया या दोषांबद्दल...
स्वयंपाक घरात काळा आणि निळा रंग वापरू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
मसाल्यांचे डबे, तांदूळ डाळी आणि पीठ दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवणे चांगले मानले जाते.
स्वयंपाक घरातील भांडी धुण्याची दिशा उत्तर पश्चिम असावी.
तुटलेली भांडी किंवा तुटलेले डस्टबिन स्वयंपाक घरात ठेवू नये.
स्वयंपाक घरात वास्तुदोष असल्यास आग्नेय दिशेला लाल रंगाचा बल्ब लावावा व तो नेहमी चालू ठेवावा.
स्वयंपाक घराला लागूनच बाथरूम असेल, तर काचेच्या भांड्यात किंवा बाटलीत मीठ भरून तिथे ठेवावे.
स्वयंपाक घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर स्वास्तिकचे शुभचिन्ह लटकवावे.
लिंबाचे सरबत
नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे
PEXELS
पुढील स्टोरी क्लिक करा