वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वास्तुशास्त्रामध्ये नमूद केलेल्या काही नियमांचे पालन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
वास्तुशास्त्रामध्ये ऑफिसशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्यास नोकरीमध्ये चांगली प्रगती होऊ शकते.
आज आम्ही तुम्हाला ऑफिसच्या डेस्कवर ठेवाव्यात अशा पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची पगार वाढ होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या डेस्कवर क्रिस्टल ठेवला तर तुमचे काम अगदी सोपे होते.
क्रिस्टलमुळे तुमच्या कामात येणारे अडथळे आधीच दूर होतात. क्रिस्टल हे उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे.
वास्तुशास्त्रात, बांबूच्या झाडाला खूप शुभ मानले जाते. छोटेसे बांबूचे झाड तुमच्या डेस्कवर ठेवल्याने तुम्हाला कामात उत्साही वाटेल.
वास्तुशास्त्रानुसार, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती डेस्कवर ठेवली पाहिजे. यामुळे तुम्हाला काम करताना शांतता मिळेल आणि कामावर लक्ष केंद्रित करता येईल.
जर, तुम्हाला नोकरीत बढती हवी असेल, तर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर जहाजाचे चित्र असलेले नाणे ठेवावे.
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या डेस्कवर गणपतीची मूर्ती ठेवली, तर तुम्हाला कधीही कोणत्या अडथळ्याचा सामना करावा लागणार नाही.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान