घरात आवर्जून ठेवा ‘या’ ४ गोष्टी; धनाची कमी भासणार नाही!

By Harshada Bhirvandekar
Apr 12, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्रामध्ये घराबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेवर आधारित आहेत.

वास्तुशास्त्रानुसार, घरात अशा काही खास वस्तू ठेवल्याने आर्थिक संकटातून मुक्तता मिळते. 

या गोष्टींमुळे आर्थिक विवंचनाचा दूर होईलच, पण घरात सकारात्मक ऊर्जाही येईल. चला जाणून घेऊया अशा खास गोष्टींबद्दल... 

वास्तुशास्त्रात पिरामिडला विशेष महत्त्व आहे. घरात पिरामिड ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात.  

घरात चांदी, पितळी किंवा तांब्याचा पिरामिड ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. घरात पिरामिड आवर्जून ठेवावा.

घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी पंचमुखी हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.  

नैऋत्य दिशेला या फोटोची किंवा मूर्तीची स्थापना करावी आणि त्याची रोज पूजा करावी. पंचमुखी हनुमानाची मूर्ती ठेवल्याने दारिद्रता दूर होते. 

देवी लक्ष्मीचे पद्म चिन्ह आणि कुबेराचा फोटो पूजास्थानी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे पैशाचीच चणचण दूर होते.  

घरात पाण्याने भरलेली घागर असावी, ही घागर उत्तर दिशेला ठेवणे खूप शुभ मानले जाते.

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!