दक्षिण दिशेला आहे घराचा दरवाजा? असा दूर करा वास्तुदोष!

By Harshada Bhirvandekar
Jul 05, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्रात म्हटलं गेलं आहे की, घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल, तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा संचार करते. 

वास्तू नुसार, अशा घरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. या समस्या धन आरोग्याशी संबंधित असतात. 

तुमच्या घरातही अशा प्रकारचा वास्तुदोष असेल, तर तो कसा दूर करता येईल, याचे उपाय जाणून घ्या.  

सगळ्यात आधी घराच्या मुख्य द्वारावर स्वास्तिक चिन्ह लावा. यामुळे वास्तुदोषामुळे होणारा नकारात्मक ऊर्जेचा संचार कमी होतो. 

घरात नियमितपणे सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करावी. यामुळे देवाची कृपा प्राप्त होते. 

असं म्हटलं जातं की, देवघरासोबतच घराच्या मुख्य द्वारावर देखील संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. याने वास्तुदोष कमी होतो. 

घराच्या मुख्य द्वारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा. यामुळे वास्तुदोष दूर होतो.  

धार्मिक मान्यतेनुसार, घरात तुळस लावून तिची रोज पूजा करावी. 

वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेल्या वस्तू असतील तर त्या आजच बाहेर फेकून द्या. बंद घड्याळ, तुटलेल्या काचा घरात नकारात्मकता घेऊन येतात. 

स्वयंपाक घराशी संबंधित दोष दूर करतील ‘हे’ सोपे उपाय!