घरात पैसा येण्यापूर्वी असे संकेत मिळतात

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 23, 2024

Hindustan Times
Marathi

माणसाचा काळ कधी चांगला असतो तर कधी वाईट. असे म्हणतात की, जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा माणसाने मातीला जरी हात लावला तर त्याचेही सोने होते.

पण जेव्हा वाईट वेळ येतो तेव्हा उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो. असे म्हटले जाते.

 काळ कधीच सारखा राहत नाही. कठीण वेळ निघून निघायला वेळ लागतो. सामान्यत: यश आणि प्रगती यावरून चांगला किंवा वाईट काळ ठरतो.

वाईट काळ सुरू झाला की कामात अडथळे येऊ लागतात आणि यश मिळणे कठीण होते. वाद, न्यायालयीन खटले, आजारपण इत्यादींमुळे माणूस त्रस्त होतो.

 पण जीवनात शुभ काळ येण्यापूर्वी काही संकेत व्यक्तीला मिळत असतात. ते शुभ संकेत नेमकी कोणती असतात. ते येथे जाणून घेऊया.

(१) तुम्ही कुठेतरी जात असाल आणि वाटेत तुम्हाला पैसे दिसले तर समजा तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. 

अशाप्रकारे अचानक धन प्राप्त होणे हे लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे.

(२) जर तुमच्या घराच्या अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर समजावे की चांगला काळ सुरू होणार आहे. चिमण्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवू शकता.

(३) जर तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय आली तर ते शुभ काळ सुरू होण्याचे लक्षण मानले जाते. तुम्ही गायीला रोटी, गूळ वगैरे खाऊ शकता.  

(४) चांगला काळ सुरू होण्यापूर्वी, रंगीबेरंगी फुलपाखरे तुमच्याभोवती घिरट्या घालू लागतात. हे देखील शुभ मानले जाते.

(५) प्रवासात किंवा घरातून बाहेर पडल्यानंतर पूजेचा नारळ दिसणे देखील शुभ लक्षण आहे. हे कामाच्या यशाची शक्यता दर्शवणारे मानले जाते.

वयाच्या ६६व्या वर्षी अभिनेत्रीने केले दुसरे लग्न!