१ जानेवारी २०२५ ला करा हे काम, वर्षभर पडेल पैशांचा पाऊस! 

By Priyanka Chetan Mali
Dec 29, 2024

Hindustan Times
Marathi

नवीन वर्ष २०२५ आपल्या आयुष्यात सुख, समृध्दी आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रत्येकाची इच्छा आहे.

अशा परिस्थितीत लोक नवीन वर्ष २०२५ च्या पहिल्याच दिवशी अनेक ज्योतिषीय उपाय करतात, जेणेकरून वर्षभर जीवनात आनंद टिकून राहतो.

ज्योतिष शास्त्रानुसार १ जानेवारी २०२५ रोजी अशी कोणती कामे करावयाची आहेत, ज्यामुळे वर्षभर पैशाची कमकरता भासणार नाही जाणून घ्या. 

१ जानेवारीला दुधात केसर मिसळून घरातील ब्रम्ह स्थानावर शिंपडा. यामूळे आर्थिक स्थिती सुधारेल असे सांगितले जाते.

घराच्या मुख्य दारावर कवड्यांपासुन बनलेले तोरण लावावे. तसेच घराच्या प्रत्येक दरवाज्यावर आणि भिंतीवर स्वस्तिक चिन्ह लावा.

घराच्या ईशान्य दिशेला कुटुंबाचा चांगला फोटो लावा. असे मानले जाते कि यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात आनंद टिकून राहतो.

नवीन वर्षाच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर ३ मोराची पिसे लावा. या उपायाने घरातील नकारात्मकता कमी होते आणि सौभाग्य वाढते.

याशिवाय नवीन वर्षाच्या दिवशी घराच्या उत्तर दिशेला नागाचे रोप लावावे. या वास्तु उपायाने घराची आर्थिक स्थिती सुधारते.

१ जानेवारी २०२५ रोजी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. असे मानले जाते कि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी