हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. यामुळे घरातील लहान-मोठी प्रत्येक गोष्ट वास्तूनुसार ठेवणे गरजेचे आहे.
अनेकवेळा आपल्याकडून कळत-नकळत अशा चुका होतात ज्यामुळे वास्तुदोष लागतो.
प्रत्येक घरांमध्ये दरवाजाच्या मागे हुक लावून लोकं कपडे टांगतात, परंतू वास्तूनुसार हे चुकीचे आहे असे सांगितले जाते.
चला जाणून घेऊया दरवाजाच्या मागे कपडे टांगल्याने काय-काय नुकसान होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, दरवाजाच्या वरच्या भागात धनाची देवी लक्ष्मी वास करते असे सांगितले जाते. अशात दरवाजाच्या मागे कपडे टांगल्याने लक्ष्मी देवी नाराज होते.
मान्यतेनुसार दरवाजाच्या मागे कपडे टांगल्याने आर्थिक स्थितीवर परिणाम होतो आणि पैशांची चणचण भासते.
वास्तूनुसार, दरवाजाच्या मागे कपडे टांगल्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे घरात वाद-विवादाचे वातावरण निर्माण होते.
दरवाजाच्या मागे कपडे टांगल्यामुळे कोणत्याच कार्यात यश मिळत नाही, अशात चुकूनही दरावाजामागे कपडे टांगू नये.
दरवाजाच्या मागे कपडे टांगल्याने सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो आणि घरातील सर्व सदस्यांच्या प्रगतीत अडथळा येतो असे सांगितले जाते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.