लग्नपत्रिका बनवताना या गोष्टींची घ्या काळजी
By
Priyanka Chetan Mali
Jan 07, 2025
Hindustan Times
Marathi
लग्न हा हिंदू धर्मातील १६ संस्कारातील एक महत्वाचा संस्कार आहे. यादरम्यान अनेक विधि, प्रथा-परंपराचा समावेश असतो.
लग्नाच्या इतर परंपरासारखेच लग्नाची पत्रिका तयार करताना वास्तूचे नियम पाळणे गरजेचे आहे.
मान्यतेनुसार वास्तूसंबंधीत गोष्टींची काळजी घेतल्यास लग्नात कोणतीच अडचण येत नाही.
जाणून घेऊया लग्नपत्रिका तयार करताना वास्तूचे कोणते नियम लक्षात ठेवावे.
पहिली लग्नपत्रिका सर्वात आधी प्रथन पूजनीय गणपती बाप्पाला अर्पण करावी.
पिवळी आणि लाल रंगाची पत्रिका शुभ मानली जाते. तर काळ्या आणि पांढऱ्या रंगाची पत्रिका अशुभ मानली जाते.
लग्नपत्रिका त्रिकोण किंवा पत्यांच्या आकाराची नसावी. यामुळे नकारात्मकता येते आणि हे अशुभ मानले जाते.
लग्नपत्रिकेवर नवरदेव-नवरीचा फोटो लावू नये, कारण यामुळे जोडप्यांवर नजरदोष लागण्याची शक्यता वाढते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा