देवघरातील देवाच्या मूर्ती किती मोठ्या असाव्यात? लक्षात ठेवा या गोष्टी
By
Priyanka Chetan Mali
Dec 15, 2024
Hindustan Times
Marathi
देवघर घेतांना ते चांगल्या दर्जेदार लाकडाचे घ्यावे. सागवान, शीसवीचे किंवा अक्रोडचे लाकूड वापरू शकतात.
वास्तूनुसार ईशान्य दिशेला देवघर बनवले पाहिजे. या दिशेला सर्व देवी-देवतांचा वास असतो.
देवघरात जास्त मोठी मूर्ती ठेवू नये. शास्त्रानुसार, मूर्ती ३ इंचापेक्षा जास्त मोठ्या आकाराच्या नाही पाहिजे.
अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराची मूर्ती देवघरात ठेऊ नये. मोठ्या मूर्ती असल्यास अनेक नियम पाळावे लागतात.
वास्तूनुसार, देवी-देवतांना जमीनीवर ठेऊ नये. मूर्ती ठेवण्यासाठी चौरंग वापरावा. देवघर जमिनीपेक्षा थोडं उंचावर पाहिजे.
देवघरात तुटलेल्या-फुटलेल्या किंवा खंडीत झालेल्या मूर्ती ठेऊ नये, कारण हे अशुभ असतं आणि यामुळे वास्तू दोष लागतो.
देवघरात शंख, घंटी, कवड्या, चंदन, तांब्याचा शिक्का, शालिग्राम, शिवलिंग, गंगाजल आणि पान्याचा तांब्या ठेवला पाहिजे.
वास्तू नुसार देवघर बनवताना लक्षात ठेवा की, ते जीन्यापासून किंवा बाथरून पासून लांब असावे.
देवघरातील देवांजवळ दिवा लावणे आणि अगरबत्ती लावणे फार शुभ मानले जाते, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन जाते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?
पुढील स्टोरी क्लिक करा