'या' ६ झाडांमुळे घरात येईल सुख समृद्धी!

By Priyanka Chetan Mali
Dec 04, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही झाडं फारच पवित्र आणि पूजनीय असतात. यांना लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.

जाणून घेऊया या ६ झाडांविषयी जी लावल्याने लक्ष्मी कृपा राहते. तसेच धनलाभ आणि सुख-शांती लाभते.

तुळस - हिंदू धर्मात तुळस ही भगवान विष्णूला समर्पित आहे. असे म्हणतात की, घराच्या अंगणात तुळस असल्यास सुख-शांती समृद्धीची कमी भासत नाही.

आवळा - आवळा लक्ष्मी-नारायणास प्रिय आहे. वास्तूनुसार घराच्या उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला हे झाड असावे.

शमी - शमीचे झाड शनिदेवाला प्रिय आहे. असे म्हणतात की, या झाडाजवळ दिवा लावल्याने आर्थिक चणचण भासत नाही.

बेलपत्र - बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असतो. असे म्हणतात की, या झाडाची पूजा केल्यामुळे गरिबी दूर होते. तसेच, बेलाचे पान भगवान शंकराला प्रिय आहे.

जास्वंद - या झाडाचीही मान्यता आहे की, जास्वंदाचे फूल पाण्यात टाकून ते पाणी सूर्य देवाला अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते.

केळ्याचे झाड - केळ्याचे झाड हे ईशान्य दिशेला लावावे. यामुळे भगवान विष्णूची कृपा राहते.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी