पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी

By Priyanka Chetan Mali
Jan 14, 2025

Hindustan Times
Marathi

घर-बंगला बांधताना वास्तुशास्त्राची विशेष काळजी घ्यायची, कारण घरामध्ये वास्तू गडबडीमुळे समस्या निर्माण होऊ शकतात.

घराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असल्यास त्याला पूर्वाभिमुख घर म्हणतात. जाणून घेऊया पूर्वाभिमुख घरासाठी काही खास वास्तू टिप्स

वास्तूनुसार, पूर्वमुखी घर सर्वात शुभ मानले जाते, कारण ही सूर्योदयाची दिशा आहे.

वास्तूनुसार, पूर्वमुखी घरात देवघर ईशान्य दिशेला ठेवणे फार शुभ मानले जाते.

पूर्वमुखी घरातील पायऱ्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला पाहिजे.

घरातील प्रवेशद्वारावर तांब्याचा सूर्य लावला पाहिजे. वास्तूनुसार, हे सुख-समृद्धीला आकर्षीत करते.

वास्तूनुसार, पूर्वमुखी घरातील उत्तर-पूर्व दिशेला बेडरूम बनवू नये. मास्टर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते.

जर घर पूर्वमुखी असेल, तर स्वयंपाकघरात जेवण बनवताना तोंड उत्तर किंवा पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते.

घराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल, तर अशा घरात बाथरूम उत्तर-पूर्व दिशेला बनवू नये.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS