आपण नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या घरी जातो, तेव्हा काही वस्तू तीथून घेऊन येतो. काही वेळा आपण अशा वस्तूंची देवाण-घेवाण करतो जे आपल्यासाठी नुकसानदायक आहे.
वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक वस्तूचे आपले स्वामीत्व असते आणि यामुळे त्याची ऊर्जाही बदलून जाते.
काही वस्तू अशा असतात, ज्या दुसऱ्यांच्या घरून आणल्यास नकारात्मकता वाढते. जाणून घ्या या ३ वस्तू कोणत्या आहे ज्या दुसऱ्यांच्या घरून आपल्या घरी आणू नये.
दूसऱ्यांच्या घरून छत्री आणणे शुभ नाही, असे केल्यामुळे ग्रहांची स्थिती बिघडते.
दूसऱ्यांच्या घरून त्यांची चप्पलही आणू नये, मान्यतेनुसार शरीरातील नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त निघते ते पाय असतात.
जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे बुट-चप्पल घालतात, तेव्हा त्यांच्यातील नकारात्मकताही तुमच्यामध्ये प्रवेश करते आणि अडचणी वाढतात.
कोणाच्याही घरून फर्निचर आणू नये, मान्यतेनुसार त्या माध्यमातून नकारात्मकताही घरी येते आणि वास्तू दोष लागतो.
जुने फर्निचर घरी आणून तुम्ही दारिद्र्याला आमंत्रण देतात आणि यामुळे हसत्या-खेळत्या कुटूंबात वाद-विवादाला सुरवात होते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी