स्वस्तिक बनवण्याची योग्य पद्धत कोणती?

By Priyanka Chetan Mali
Jan 02, 2025

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह आवश्यक आहे.

असे मानले जाते कि स्वस्तिक चिन्ह घरामध्ये योग्य दिशेला ठेवले आणि योग्य प्रकारे बनवले तर सुख-समृध्दी येते.

स्वस्तिकाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. चला जाणून घेऊया काय आहे स्वस्तिक बनवण्याचा योग्य नियम.

ज्योतिषाच्या मते, चंदन, कुंकु किंवा हळदीने स्वस्तिक बनवणे शुभ मानले जाते.

यासाठी सर्वप्रथम स्वस्तिकाची उजवी बाजू बनवा. यानंतर डावी बाजू बनवा.

यासोबतच हेही लक्षात ठेवा की चुकूनही उलटे स्वस्तिक बनवू नये आणि वापरु नये.

वास्तुशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह ईशान्य किंवा उत्तर दिशेला बनवणे उत्तम मानले जाते.

ज्योतिषाच्या मते स्वस्तिक हे ऋग्वेदात सूर्याचे प्रतीक मानले गेले आहे. स्वस्तिकचे चार हात हे चार दिशा दर्शवतात.

घराच्या दारावर, मंदिरात, तिजोरीवर आणि भितींवर स्वस्तिक काढतात आणि त्याची पूजा करतात.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

प्रिया सरोज कोण आहे?