घरात किंवा तिजोरी कुठे ठेवावी

By Rohit Bibhishan Jetnavare
Jun 25, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्र ही ज्योतिषाची एक शाखा आहे, ज्यामध्ये घराची नकारात्मकता नाहीशी करून सकारात्मक ऊर्जा विकसित करण्याचे उपाय सांगितले आहेत.

घर बांधताना आणि सजवताना वास्तू नियमांची काळजी घेतली नाही तर अनेक समस्या निर्माण होतात. 

अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती रोखली जाते, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

यामुळे आर्थिक नुकसाना होते, त्यामुळे घरातील किंवा दुकानाची तिजोरी ठेवण्याचं सर्वोत्तम ठिकाण कोणतं? हे जाणून घेऊया.

वास्तूच्या नियमांनुसार, तिजोरी किंवा लॉकर किंवा पैसे ठेवण्यात येणारी इतर कोणतेही कपाट नेहमी दक्षिण दिशेला ठेवावी. तसेच, या तिजोरीचे तोंड उत्तर किंवा पश्चिम दिशेला उघडले पाहिजे. 

या व्यतिरिक्त, आपण तिजोरी अशा प्रकारे ठेवू शकता की त्याचे तोंड पूर्वेकडे उघडले जाते. ते भिंतीच्या दक्षिण दिशेला ठेवावे. 

जेणेकरुन त्याचे तोंड उत्तर किंवा पश्चिम दिशेने उघडेल. यामुळे घरात समृद्धी येते आणि कुटुंबात समृद्धी येते. पण, तिजोरीचे तोंड कधीही दक्षिण दिशेला उघडू नये.  

विमानात ‘या’ गोष्टी आहेत बॅन; घेऊन जाल तर पकडतील पोलीस!