हातातून या वस्तू पडणं खूपच अशुभ

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 25, 2024

Hindustan Times
Marathi

एखादी वस्तू हातातून खाली पडणे ही एक सामन्या गोष्ट आहे. पण असं वारंवार होत असेल तर तर मग काहीतरी गडबड नक्कीच असते.

एखादी वस्तू हातातून वारंवार पडत असेल तर ते अशुभ मानले जाते. खास करून जर पांढऱ्या रंगाची वस्तू पडत असेल तर चिंतेची बाब असते.

जर तुमच्या हातातून मीठ वारंवार पडत असेल तर ते वाईट संकेत असतात. तुमच्या घरात आर्थिक अडचण येण्याचे हे संकेत आहेत.

तसेच, जर गॅसवर ठेवलेले दुध उकळून वारंवार खाली येत असेल तर तेही अशुभ मानले जाते. हे मोठ्या संकटाचे संकेत आहे.

जर तुमच्या हातातून दही पडले तर तेही अप्रिय घटना घडणार असल्याचे संकेत मानले जाते.

तुमच्या हातातून वारंवार भात किंवा तांदूळ खाली पडत असेल तर तेही अशुभ आहे. यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि घरातील प्रगती समृद्धी ठप्प होते.

शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. पूजेदरम्यान शंख खाली पडला तर तेही अशुभ संकेत मानले जातात.

जर तुमच्या हातातून या गोष्टी वारंवार पडत असतील तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्यावर मोठं संकट येऊ शकते.  

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?