शुक्रवारी करा हे काम, पैशांची कमतरता भासणार नाही

By Rohit Bibhishan Jetnavare
Jan 26, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही आर्थिक संकटाशी झुंजत असाल तर काही छोटे-छोटे उपाय तुमचे नशीब बदलू शकतात.

जर तुमच्याजवळ किंवा घरात पैसा टिकत नसेल तर तुमच्यासाठी वास्तूचा एक उपाय खूप उपयुक्त ठरू शकतो.

तुमच्याजवळ पैसा टिकत नसेल किंवा कामात यश येत नसेल तर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा.

धनाची देवी लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो, म्हणून शुक्रवारी लक्ष्मीला गुलाबाची माळ अर्पण करा.

तसेच, घरातील महिलांनी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कमळाचे फूल आणि पांढरी मिठाई अर्पण करावी.

शुक्रवारी संपूर्ण घराची साफ-सफाई करावी, कारण लक्ष्मीला घाण अजिबात आवडत नाही.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजात एक दिवा लावावा.

शुक्रवारी तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला पैशांची कमतरता कधीच भासणार नाही. कामातही यश मिळेल.

जो मनुष्य लक्ष्मीला प्रसन्न करतो, त्या व्यक्तीचे भाग्य बदलते आणि प्रत्येक कामात यश मिळते.

लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते.

हे एक छोटेसे काम आणि उपाय तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकतात.

त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी टिप्स!

pixa bay