चुकूनही फुकटात घेऊ नका ‘या’ गोष्टी; नाहीतर व्हाल कंगाल!
By
Harshada Bhirvandekar
May 04, 2024
Hindustan Times
Marathi
वास्तुशास्त्र हे उर्जेवर आधारित आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी वास्तुशास्त्रात अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी कुणाकडून फुकटात घेऊ नयेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात कंगाल होऊ शकता. जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल...
वास्तुशास्त्रात मिठाचा संबंध शनीशी आहे. मीठ कधीही कुणाकडून फुकटात घेऊ नये.
एखाद्याकडून फुकटात मीठ घेऊन त्याचा वापर केल्याने त्या व्यक्तीवर कर्जाचा बोजा वाढतो, असे मानले जाते.
एखाद्याकडून फुकटात रुमाल घेणे आणि त्याचा वापर करणे तुम्हाला महागात पडू शकते. यामुळे तुमच्यात भांडणं होऊ शकतात.
असे मानले जाते की, ज्या व्यक्तीकडून तुम्ही फुकटात रुमाल घेतला तो भविष्यात तुमचे नातेसंबंध बिघडवू शकतो.
लोखंड देखील शनीशी संबंधित आहे. लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू कोणाकडूनही फुकटात घेणे चांगले मानले जात नाही.
कुणाकडूनही फुकटात सुई घेऊ नये. यामुळे नातेसंबंध बिघडतात आणि आर्थिक नुकसान होते, असे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, कधीही कुणाकडून फुकटात तेल घेऊ नये, त्यामुळे तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा