घराचा मुख्य दरवाजा या दिशेला ठेवा, घरात सुख- समृद्धी, पैसा येतो  

By Rohit Bibhishan Jetnavare
Jan 29, 2024

Hindustan Times
Marathi

घरातील दाराच्या दिशेचा आपल्या नशिबाशी खूप मोठा संबंध असतो. घरातून बाहेर पडताना आपले तोंड ज्या दिशेला असते, तीच आपल्या दाराची दिशा असते.

वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजावर सावली नसावी. अशा परिस्थितीत घर बांधताना मुख्य दरवाज्याशेजारी एकही झाड किंवा खांब नसावा हे लक्षात ठेवा.

मुख्य दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्यांची संख्या विषम असावी. म्हणजेच घराच्या दरवाजाला लागून असलेल्या पायऱ्यांची संख्या ३, ५ किंवा ७ असावी.

मुख्य दरवाजाची रुंदी दरवाजाच्या प्रमाणात अर्धी ठेवा. म्हणजेच जर मुख्य दरवाजाची लांबी १० फूट असेल तर दरवाजाची रुंदी फक्त ५ फूट ठेवावी.

घराचा मुख्य दरवाजा घरातील इतर सर्व खोल्यांच्या दरवाज्यांपेक्षा उंच असावे. वास्तुशास्त्रात ते शुभ आहे असा उल्लेख आहे.

मुख्य दरवाजा उत्तर दिशेला ठेवल्याने धनाची प्राप्ती होते.

 मुख्य दरवाजा पूर्व दिशेला ठेवल्याने घरात शांतता राहते.  तर मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असल्यास सौभाग्य वाढते.

वादळावाणी! सई ताम्हणकरचे खास फोटोशूट