चुकीच्या दिशेला लावलेला आरसा घरात आणेल दारिद्र्य!

By Harshada Bhirvandekar
Apr 04, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्रात दिशेला खूप महत्त्व आहे, म्हणूनच जेव्हा आपण एखादी वस्तू घरी आणतो, तेव्हा ती ठेवण्यासाठी योग्य दिशा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

त्याचबरोबर आरसा हा घराचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा वापर चेहरा पाहण्यासाठी तसेच सजावटीसाठी केला जातो.  

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आरसा योग्य दिशेला लावला नाही, तर वाईट परिणाम मिळण्याची शक्यता आहे. चला तर, जाणून घेऊया आरसा लावण्याची योग्य दिशा... 

घराच्या दक्षिण, पश्चिम आणि आग्नेय कोपऱ्यातील भिंतीवर कधीही आरसा लावू नका. 

जर, तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये या दिशेला आरसा असेल, तर तो लगेच काढून टाका. कारण, ते अशुभाचे लक्षण आहे. 

जर तुम्ही या भिंतीवरून आरसा काढू शकत नसाल, तर तो कापडाने झाकून ठेवा जेणेकरून त्याचे प्रतिबिंब कशावरही पडणार नाही.  

वास्तूनुसार घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावलेला आरसा हानिकारक असतो. त्यामुळे व्यक्तीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. 

तुमच्या घरात तुटलेली काच असेल तर लगेच फेकून द्या. कारण, त्यातून बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा जीवनात अडचणी निर्माण करू शकते.  

वास्तुशास्त्रानुसार आरसा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा. तर आरशावर कधीच डाग असू नयेत.

उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी कांदा कशी मदत करतो?

Pexels