घरात पोपट पाळणे शुभ की अशुभ? जाणून घ्या

By Harshada Bhirvandekar
Jun 06, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्रात ज्याप्रमाणे कोणती वस्तू ठेवण्याचे नियम दिले आहेत त्याचप्रमाणे पशुपक्षी ठेवण्याचे नियम दिले आहेत.  

अनेकांना घरात प्राणी आणि पक्षी पाळीव म्हणून ठेवणे आवडते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

असाच एक पक्षी म्हणजे पोपट, जो आपल्या घरात अनेकदा पाळला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की, घरात पोपट पाळणे शुभ आहे की, अशुभ?  

वास्तुशास्त्रानुसार, पोपट पाळणे शुभ मानले जाते. कारण, यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात आनंद वाढतो.

वास्तुशास्त्रानुसार, उत्तर किंवा पूर्व दिशेला पाळलेल्या पोपटाचा पिंजरा ठेवणे शुभ मानले जाते.  

उत्तर दिशा ही बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक असलेल्या बुध ग्रहाची दिशा मानली जाते.  

असे मानले जाते की, या दिशेला पोपटाचा पिंजरा ठेवल्याने मुलांची अभ्यासात मदत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.  

पूर्व दिशा ही सूर्य देवाची दिशा मानली जाते. असे मानले जाते की, या दिशेला पोपट ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते.  

तुम्ही पिंजऱ्यात पोपट ठेवत असाल, तर पोपट सुखी राहतो की, नाही याकडे लक्ष द्या. पिंजऱ्यातील पोपट आनंदी नसेल तर, घरात नकारात्मकता येते.

गरोदरपणात टाळा हे पदार्थ