हातातून ‘या’ ५ गोष्टी खाली पडणे असते अशुभ!

By Harshada Bhirvandekar
Jun 07, 2024

Hindustan Times
Marathi

आयुष्यातील काही घटना आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की, हातातून काही वस्तू खाली पडणे अशुभ मानले जाते. 

आज आम्ही तुम्हाला अशाच पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे हातातून खाली पडणे अशुभ मानले जाते.re

अचानक तुमच्या हातून मीठ पडले तर येत्या काळात तुम्हाला पैशाची कमतरता भासण्याची शक्यता आहे.  

वास्तूनुसार, शुक्र आणि चंद्र मिठात सामावलेले असतात आणि त्यांच्या पडण्याने देखील जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.  

हातातून खाली पडणारे दूध अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, हातातून दूध खाली पडल्यास घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो.  

वास्तुशास्त्रानुसार, दूध सांडल्याने घरातील संकट स्पष्टपणे सुचित होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ लागतात.  

तांदूळ किंवा गहू यासारखे धान्य हातातून पडले तर हे अशुभाचे लक्षण मानले जाते. हातातून धान्य खाली पडणे हा माता अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो.  

तुमच्या हातून काळी मिरी खाली पडली म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीची प्रकृती येत्या काही दिवसात बिघडू शकते.  

शास्त्रामध्ये पूजेचे ताट खाली पडणे देखील अशुभ मानले गेले आहे. याचा अर्थ देवाने तुमची पूजा स्वीकारली नाही.

लेडी सुपरस्टार नयनताराच्या साडीत दिलखेचक अदा 

Instagram