वास्तू टिप्स - घरात या जागेवर चुकूनही ठेऊ नका पैसे
By
Priyanka Chetan Mali
Dec 12, 2024
Hindustan Times
Marathi
वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्व सांगण्यात आले आहे. घरातील काही जागेवर पैसा ठेवल्याने वास्तुदोष लागतो असेही सांगितले जाते.
वास्तूनुसार चुकीच्या जागेवर पैसे ठेवल्याने कर्ज, खर्चात वाढ, पैशांची चणचण या अडचणी उद्भवतात.
अशात जाणून घेऊया वास्तूनुसार घरातील कोण-कोणत्या जागेवर चुकूनही पैसे ठेऊ नये.
काळोखात तिजोरी ठेवल्याने वास्तू दोष लागतो आणि पैशांची चणचण भासते.
घरात जर तुम्ही पैसे अशा ठिकाणी ठेवाल ज्याची भिंत टॉयलेट किंवा बाथरूनला लागून असेल, तर हे देखील चुकीचे आहे.
मान्यतेनुसार अशाने हातात पैसा टिकत नाही आणि अतिरिक्त खर्च वाढतो.
पैसे घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेलाही ठेऊ नये. कारण ही दिशा यमाची मानली जाते.
वास्तूनुसार या दिशेला पैसे ठेवल्याने घरात दारिद्र्य येते आणि पैशांची चणचण भासते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा