देवघरात चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी!

By Harshada Bhirvandekar
Jun 30, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात घरामध्ये देव्हारा ठेवून किंवा मंदिर बांधून त्यामध्ये देवतेची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात.  

मात्र, वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या मंदिरात किंवा देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

अनेक जण दररोज देवघराची स्वच्छता करतात. पण, साचलेला कचरा एका बाजूला ठेवून देतात. असे चुकूनही करू नये. मंदिर नेहमी स्वच्छ असावे.  

मंदिरात किंवा देवघरात टोकदार वस्तू ठेवू नये. कात्री, खिळे इत्यादी वस्तू देवघरापासून दूर ठेवाव्यात. 

देवाला अर्पण केलेली ताजी फुले सुकल्यानंतर लगेचच काढून टाकावीत. सुकी फुले देवघरात ठेवू नये.

वास्तुशास्त्रानुसार, शनि देवाची मूर्ती घरामध्ये किंवा देवघरात ठेवता येत नाही.  

वास्तुशास्त्रानुसार, देवघरातील कोणतीही मूर्ती तुटली असेल किंवा तिला तडा गेला असेल, तर ती देव्हाऱ्यात ठेवू नये.

मुलांचे अभ्यासात मन लागत नाही, या वास्तू टिप्स कामी येतील