तुमची मुलंही अभ्यासात मागे पडताय, अभ्यासात मन लागत नाही आहे तर याचे कारण वास्तू दोष असू शकते.
जाणून घेऊया कोणते वास्तू दोष दूर करून मुलांचे अभ्यासातील अडचणी दूर होऊ शकतात.
वास्तूनुसार, अभ्यास करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे. या दिशेला तोंड करून अभ्यास केल्याने सरस्वती देवीची कृपा प्राप्त होते.
शास्त्रानुसार, घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास केल्याने मुलांचे अभ्यासात लक्ष लागते आणि वाचलेलं लवकर समजतं.
मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत खेळणी किंवा अशी कोणतीही गोष्ट ठेऊ नये ज्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होईल.
वास्तूनुसार घरात मुलांची अभ्यासाची खोली कधिही दक्षिण दिशेला नसावी. असे असल्यास मुलांना अभ्यासात अनेक अडचणी येतात.
अभ्यासाच्या खोलीत उत्तर-पूर्व दिशेला सरस्वती मातेचा फोटो नक्की लावा. या खोलीत चुकूनही हिंसक फोटो लावू नये.
वास्तूनुसार असे सांगितले जाते की, स्टडी टेबल असल्यास तो कधिही भिंतीला लागून ठेऊ नये. अभ्यासाच्या टेबलावर क्रिस्टल पिरॅमीड ठेवावे.
अभ्यास करताना मुलांची पाठ खिडकी किंवा दरवाजाजवळ नसावी, यामुळेही मुलांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होत नाही.
मुलांच्या अभ्यासाच्या खोलीचा भिंतीचा रंग पिवळा, पांढरा किंवा बदामी असावा. याशिवाय स्टडी टेबलचा रंग क्रीम किंवा फिकट असला पाहिजे.
मुलांच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम वेळ पहाटे किंवा सकाळची असते असे सांगितले जाते. या वेळी केलेला अभ्यास मुलांच्या जास्तीत जास्त वेळ पर्यंत लक्षात राहतो.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.