घराची तोड-फोड न करता दूर होईल वास्तू दोष, करा या गोष्टी

By Priyanka Chetan Mali
Jan 07, 2025

Hindustan Times
Marathi

तुम्ही तुमच्या घरात तोड-फोड न करता वास्तू दोषापासून मुक्ती मिळवण्याचा विचार करताय, तर या गोष्टी तुम्हाला उपयुक्त ठरतील.

सकाळ-संध्याकाळ देवपूजा करताना दररोज शंख वाजवल्यामुळे वास्तू दोषामुळे निर्माण झालेली नकारात्मकता दूर होते.

धार्मिक मान्यतेनुसार घरात किंवा अंगणात तुळशीचे रोप लावल्याने वास्तूदोष दूर होतो.

घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकचे चिन्ह काढल्याने किंवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही असे सांगितले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, घराच्या मुख्य दरवाजाजवळ दररोज दिवा लावल्याने वास्तू दोषाचा प्रभाव कमी होतो.

वास्तुशास्त्रानुसार, घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला चांदिची बासरी ठेवल्याने वास्तू दोष दूर होतो.

मानले जाते की, घरात मीठ किंवा तुरटी पाण्यात टाकून लादी पुसल्याने वास्तू दोषाचा परिणाम कमी होतो.

लक्षात ठेवा घरातील वायव्य दिशेला नेहमी उजेळ पाहिजे. घरातील या कोपऱ्यात दररोज दिवा लावू शकतात.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

घरच्या घरी व्हेज मेयोनीज कसं बनवाल?