वसंत पंचमीला पिवळे कपडे का घालतात

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात वसंत पंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा केली जाते.

ज्या हंगामात वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. त्या ऋतूत संपूर्ण वातावरण पिवळ्या रंगात रंगून जाते.

एवढेच नाही तर पिवळी फुले, पिवळी फळे, पिवळा तांदूळही देवी सरस्वतीला अर्पण केला जातो.

शास्त्रात सांगितले आहे की, पिवळा रंग सुख, शांती आणि तणाव दूर करणारा मानला जातो.

वसंत ऋतूच्या आगमनाने वातावरणातील गारवा बराच कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते.

झाडांवर नवीन पाने येऊ लागतात, कळ्या फुलू लागतात. मोहरीचे पीक पक्व होते. त्यामुळे निसर्ग चहु बाजूंनी पिवळ्या रंगाची शाल ओढवुन घेतो.

वसंत पंचमीच्या दिवशी सूर्यकिरणांमुळे पृथ्वीवर पिवळी किरणे पडतात. सर्व काही पिवळे-पिवळे असते. 

त्यामुळे या दिवशी सरस्वतीचे भक्त पिवळे वस्त्र परिधान करून निसर्गाच्या पिवळ्या रंगात रंगून जातात

पिवळा रंग शास्त्रोक्त सुद्धा खूप खास मानला जातो. पिवळा रंग तणाव दूर करतो आणि मनाला शांती देतो.

यासोबतच पिवळा रंग आत्मविश्वास वाढवणारा मानला जातो. अनेक फायदे असल्याने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केलेली पूजा शुभ फळ देते.

रश्मिका मंदानाचे आगामी सिनेमे कोणते?