वसंत पंचमीला सरस्वती देवीला हे नैवेद्य करा अर्पण

By Priyanka Chetan Mali
Jan 30, 2025

Hindustan Times
Marathi

माघ महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो.

या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या वस्तूंचा नैवेद्य अर्पण करू शकतात.

जाणून घेऊया वसंत पंचमीच्या पूजेमध्ये कोण-कोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करता येईल.

तांदूळाचे पीठ करून, त्यात केसर मिसळून केसर फिरनी तयार करू शकतात आणि सरस्वती देवीला नैवेद्य अर्पण करू शकतात.

बेसनाचे किंवा बुंदीचे पिवळे लाडू सरस्वती देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात.

विद्येच्या देवीला रवा किंवा चन्याच्या डाळीचा शिरा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात.

रबडीमध्ये केसर मिसळून पूजेदरम्यान देवी सरस्वतीला नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर प्रसाद वाटप करा.

गोड केसर मिसळलेला पिवळा भात घरी तयार करा आणि सरस्वती देवीला नैवेद्य अर्पण करा.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay