वसंत पंचमीला सरस्वती देवीला 'या' पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा

By Priyanka Chetan Mali
Feb 13, 2024

Hindustan Times
Marathi

बुधवार १४ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी असून. यादिवशी सरस्वती मातेच्या पूजनाला फार महत्व आहे. 

यादिवशी सरस्वती देवीला नैवेद्य म्हणून कोणकोणते पदार्थ अर्पण करावे जाणून घ्या.

गोड बुंदी सरस्वती मातेला गोड बुंदीचा नैवेद्य अर्पण करू शकतात. यामुळे अडचणी दूर होतात आणि जीवनात सुख-शांती नांदते असे सांगितले जाते.

मालपुआ सरस्वती मातेची कृपा मुलांवर राहावी यासाठी मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा.

जिलेबी वसंत पंचमीला बेसन किंवा मैद्याची पिवळी जिलेबीचाही नैवेद्य दाखवणे लाभदायक ठरेल.

पिवळा गोड भात सरस्वती देवीच्या पूजनात पिवळ्या रंगाचे फार महत्व असून, यादिवशी पिवळा गोड भाताचा नैवेद्य अर्पण करा.

पिवळे लाडू सरस्वती मातेला पीवळे बुंदीचे किंवा बेसनाचे लाडूचा नैवेद्य अर्पण करा. यामुळे सरस्वती देवी प्रसन्न होईल.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक माहिती आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

वजन कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे 'लो कॅलरी' पदार्थ!

Photo Credits: Pexels