अंडी हा प्रथिने आणि जीवनसत्वांचा चांगला स्त्रोत आहे. रोज एक अंड खाल्ल्याने वजन वाढते, हाडे मजबूत होतात आणि दृष्टी सुधारते.
काही लोक नाश्त्यात उकडलेली अंडी खातात, याने पोट भरते आणि शरीरालाही फायदा होतो.
अनेकदा असे होते की, अंडी उकडताना ती पाण्यातच फुटतात आणि फुटलेली अंडी नीट उकडली जात नाहीत. त्यात पाणी शिरते.
जर तुम्हीही अंडी उकडत असताना ती अशी फुटत असतील, तर या दोन टिप्स वापरून तुम्ही अंडी सहज उकडू शकता.
यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन, त्यात अंडी बुडतील एवढे पाणी ओता. हे पाणी व्यवस्थित उकळू द्या. त्यात थोडेसे मीठ घाला.
मीठ टाकल्यानंतर या पाण्यात थोडासा लिंबाचा रस पिळा. यामुळे उकडण्याची प्रक्रिया सोपी होईल आणि अंड्याचे कवच देखील सहज सोलले जाईल.
जर, तुम्ही खाण्यासाठी अंडी उकडून घेत असाल, तर ती किमान दहा मिनिटे तरी उकडत ठेवा आणि जर तुम्ही अंड्याची आमटी बनवण्यासाठी उकडत असाल तर ती बारा मिनिटे उकळू द्या.
त्याशिवाय अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये देखील अंडी उकडू शकता.
कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात एक छोटासा जाळीचा ट्रे ठेवून त्यात, पाणी घालून अंडी ठेवा आणि या पाण्यात थोडेसे मीठ टाका आणि तीन शिट्ट्या करा.