आज आपण अशा एका महिला अधिकाऱ्याची माहिती घेऊयात जीने वडिलांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयपीएस सोडून आयएएस परीक्षा उत्तीर्ण करत जिल्हाधिकारी झाली.
मुद्रा गैरोला असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. मुद्रा या उत्तराखंड राज्यातील चमोली येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांना देखील आयएएस व्हायचं होतं. मात्र, त्यांना यश मिळालं नाही.
एक दिवस त्यांनी त्यांची इच्छा मुलगी मुद्रा हिला बोलून दाखवली. मी आयएएस अधिकारी होऊ शकलो नाही, पण तू ही परीक्षा पूर्ण करावी अशी इच्छा असल्याचे त्यांचे वडील म्हणाले.
मुद्रा या तेव्हा मास्टर ऑफ डेंन्टल सर्जरी करत होत्या. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्रा यांनी त्याचे मेडिकलचे शिक्षण मध्येच सोडून दिले.
मुद्रा यांनी १२ वी नंतर मुंबई येथे येत बॅचलर ऑफ डेंन्टल सर्जरी पूर्ण केले. यानंतर त्यांनी मास्टर ऑफ डेंन्टल सर्जरीसाठी प्रवेश घेतला.
मात्र, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१८ मध्ये पाहिल्यांना परीक्षा दिली. यात पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झाल्या. मात्र, इंटरव्ह्युमध्ये नापास झाल्या.
यानंतर मुद्रा यआणि २०२० मध्ये पुन्हा परीक्षा दिली. मात्र, या वेळेला देखील त्यांना यश मिळाले नाही. सलग तीन वेळा अपयश आल्यावर देखील मुद्रा यांनी हिम्मत करून २०२१ मध्ये पुन्हा परीक्षा दिली.
यात त्यांना यश मिळालं. त्यांना देशात १६५ वी रॅंक मिळाली. या आधारावर त्या आयपीएससाठी पात्र ठरल्या.
यानंतर मुद्रा यांनी पुन्हा परीक्षा देत त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करत देशात ५३ रॅंक मिळवली आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या. या पद्धतीने त्यांनी त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.