शिकवणी घेऊन केला UPSCचा अभ्यास! कठोर मेहनतीच्या जोरावर बनली IPS 

By Ninad Vijayrao Deshmukh
Jan 20, 2025

Hindustan Times
Marathi

यूपीएससीची परीक्षा पास होऊन IAS आणि IPS बनण्यासाठी कठोर मेहनत आणि अभ्यास करावा लागतो. काहींना यश मिळतं तर काहींच्या पदरी अपयश येतं. 

आज आम्ही तुम्हाला IPS पूजा यादव यांच्या बद्दल सांगणार आहोत. ज्यांचा प्रवास युवकांसाठी प्रेरणादाई आहे. 

आयपीएस पूजा यादव या मूळच्या हरयाणाच्या नूह येथील रहिवासी आहेत. 

त्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. त्यांचं सर्व शिक्षण नूह येथून झाले आहे. त्यानंतर त्यांनी बीई पूर्ण केलं. 

त्यांनी एमटेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. या काळात त्यांनी मुलांच्या शिकवण्या घेऊन अभ्यास करत पैसे देखील मिळवले. 

त्यांनी त्यांच्या अभ्यासाचा संपूर्ण खर्च शिकवणीतून मिळणाऱ्या पैशातून केला. एवढचं नाही तर त्यांनी रिसेप्शनिस्ट म्हणून  देखील काम केलं आहे. 

पूजा यांना एमटेक पूर्ण केल्यावर विदेशात नोकरी मिळाली होती. त्यांनी रिसेप्शनिस्ट म्हणून कॅनडा आणि जर्मनीमध्ये काम केलं आहे. 

पूजा यादव यांनी २०१७ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिलेली. मात्र, त्यांना अपयश आलं. 

२०१८ मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यात त्यांना यश मिळालं. देशात त्यांना १७४ वी रॅंक मिळाली. त्यांची निवड आयपीएससाठी करण्यात आली. 

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS