भारतातील सर्वात कठीण परीक्षा असणारी यूपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी सलग १५ ते १६ तास अभ्यास करून या परीक्षेची तयारी करत असतात.
अशाच पद्धतीने तब्बल १६ ते १७ तास अभ्यास करून आयएएस अधिकारी बनलेल्या एका महिला अधिकाऱ्याची आज आपण माहिती घेणार आहोत.
वंदना मिना असे या महिला आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. वंदना मिना या सोशल मिडियावर देखील खूप सक्रिय असतात.
वंदना मिना या मूळच्या राजस्थान येथील असून त्यांच्या गावाचे नाव टोकसी आहे.
वंदना मिना यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षेत देशातून ३३१ वी रॅंक मिळवत कुटुंबांचेच नाही तर गावाचे नाव रोशन केले आहे.
वंदना मिना या सुरवाती पासून अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या आचार्य नरेंद्र जैन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
वंदना मिना यांनी गणित ऑनर्स विषयात शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील पृथ्वीराज मिना हे दिल्ली पोलिस दलात आहेत. तर आई गृहिणी आहे.
वंदना मिना सांगतात परीक्षेचा कोणताही शॉर्टकट नाही. त्यांनी या परीक्षेसाठी तब्बल १५ ते १६ तास अभ्यास केला होता. या सोबतच वर्षाच्या सुट्टीमध्ये देखील त्यांनी सलग १० तास अभ्यास केला आहे. यामुळे त्यांना या परीक्षेत यश मिळाले आहे.
आयएएस वंदना मिना या यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी सोशल मिडियावर व्हिडिओ अपलोड करत असतात.