देशातील अनेक आयएएस अधिकारी हे सोशल मिडियावर फेमस आहेत. यातील एक नाव आहे आयएएस अधिकारी प्रिया राणी यांचं.
प्रिया राणी यांचा आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास प्रेरणादाई आहे.
प्रिया राणी या बिहार राज्यातील फुलवारी शरीफ जिल्ह्यातील कुरकुरी गावातील रहिवासी आहेत.
गावात राहणाऱ्या प्रिया राणी यांच्या शिक्षणाला आधी घरच्यांनी विरोध केला होता. मात्र, त्यांच्या आजोबांच्या पाठींब्यामुळे जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रिया राणी आज आयएएस अधिकारी बनल्या आहेत.
२० वर्षांपूर्वी त्यांच्या आजोबांनी त्यांना पाटणा येथे शिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. पाटणा येथे भाड्याच्या खोलीत राहून प्रिया राणी यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.
यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नात पास होऊन त्यांना डीफेन्स सर्व्हिस मिळाली होती. मात्र, त्यांना आयएएस व्हायचे होते.
तिसऱ्या प्रयत्नात अपयश मिळून देखील त्यांनी हार मानली नाही. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी चौथ्या प्रयत्नात यश मिळवलं.
प्रिया राणी यांनी यूपीएससी परीक्षेत ६९ रॅंक मिळवली.
प्रिया राणी या रोज सकाळी ४ वाजता उठून अभ्यास करायच्या. जिद्द आणि मेहनत हे त्यांच्या यशाच गमक असल्याचं त्या सांगतात.