भर सामन्यात झोपली उंच उडीपटू, उठताच जिंकलं सुवर्णपदक
By Rohit Bibhishan Jetnavare Aug 07, 2024
Hindustan Times Marathi
पॅरिसमध्ये सध्या ऑलिम्पिक खेळांचा उत्सव सुरू आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडूंनी पदके जिंकली आहेत.
या दरम्यान, विश्वविक्रम धारक युक्रेनची उंच उडीपटू यारोस्लावा माहुचीख हिने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे. मात्र हे पदक जिंकण्यापूर्वी ती चक्क झोपलेली दिसली.
झोपेतून उठल्यानंतर तिने चमत्कार केला आणि उंच उडीत सुवर्ण पदक जिंकले.
सुवर्ण कमावण्यापूर्वी, यारास्लावा हिचे स्लीपिंग बॅगवर झोपलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
२२ वर्षीय यारोस्लाव्हाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये युक्रेनला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
रिलॅक्स आणि फोकस राहण्यासाठी ती अशी युक्ती वापरते. यारास्लाव्हा नेहमीच तिच्याजवळ स्लिपिंग बॅग ठेवते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर ती म्हणाली. “जेव्हा मी झोपते तेव्हा मला आराम वाटतो, त्यामुळे मी लक्ष्य केंद्रित करू शकते”.
तर यारास्लाव्हाचे प्रशिक्षक सेर्ही स्टेपनोव यांनी सांगितले की, पायांमध्ये रक्त साचू नये म्हणून हा उपाय करते. ती नेहमी योगा मॅट, स्लीपिंग बॅग आणि अतिरिक्त मोजे सोबत ठेवते.
बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर