लग्न न करताच ‘या’ अभिनेत्रीला व्हायचंय आई

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Sep 04, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्ही मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता अचानक लाइमलाइटमध्ये आली आहे.

टीनाने खुलासा केला आहे की, ती लग्न न करताच आई होणार आहे. 

आई बनण्यासाठी टीनाने आपले एग्स फ्रीज केले आहेत. त्यामुळे आई बनण्याचे वय निघून गेल्यानंतरही ती मूल घरी आणू शकणार आहे.

अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या आई-वडिलांना नातवंडाचा तोंड पाहायचंय. यामुळे ती सेरोगेसीचा प्रयत्न करणार आहे. 

टीनाने चाहत्यांना सांगितले की, भविष्यात ती सेरोगेसीच्या माध्यमातून आई बनणार आहे. 

मात्र ती आई कधी बनणार हे सांगितले नाही.

टीना दत्ता सध्या ३२ वर्षांची असून अजून तिने लग्नाबाबत विचार केलेला नाही.

अभिनेत्रीने एक मुलाखतीत सांगितले होते की, जिवंत राहण्यासाठी लग्न करणे आवश्यक नसल्याचे टीना दत्ताने म्हटले आहे.

टीनाचे लग्न ठरलं होतं मात्र लग्नापूर्वीच ती कौटुंबिक हिंसाचाराची शिकार झाली होती. त्यानंतर तिने सिंगल राहणेच पंसत केले.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!