खऱ्या आयुष्यात ‘अधिपती’ किती शिकलाय?

By Harshada Bhirvandekar
Jun 17, 2024

Hindustan Times
Marathi

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.

या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी लगेच आपलंसं करून घेतलं.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता हृषिकेश शेलार झळकत आहे.

मालिकेत अधिपती हा अशिक्षित व अडाणी दाखवला आहे, मात्र प्रत्यक्षात अधिपती हा उच्चशिक्षित आहे.

एका मुलाखतीत अधिपतीने म्हणजेच अभिनेता हृषिकेश शेलारने त्याचे शिक्षण सांगितले.

मूळचा सांगलीचा असणाऱ्या हृषिकेश शेलारने एम.बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे.

हृषिकेशला अभ्यासात फारशी गोडी नव्हती. मात्र त्याने आई-वडिलांच्या सांगण्यावरुन त्याचे एम.बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

अभिनयाच्या वेडापायी हृषिकेशने उच्च शिक्षण व चांगली नोकरी सोडून अभिनयाची वाट निवडली.

हृषिकेशने अनेक मालिकांमधून काम करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. 

वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या हे शाकाहारी पदार्थ

Photo Credits: Unsplash