आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे ५ खेळाडू

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 08, 2024

Hindustan Times
Marathi

IPL २०२४ मध्ये रोहित शर्माने एक मोठी कामगिरी केली. रोहितने IPL मध्ये १०० झेल पूर्ण केले आहेत. 

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. IPL मध्ये १०० किंवा त्याहून अधिक झेल घेणारा रोहित हा चौथा क्षेत्ररक्षक आहे. 

आज या निमित्ताने  IPL मध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या टॉप-५ क्षेत्ररक्षकांबद्दल जाणून घेऊया.

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत शिखर धवन पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने २२१ सामन्यात ९८ झेल घेतले आहेत.

रोहित शर्माने २४७ व्या सामन्यात १०० वा झेल घेतला. रोहितने डेक्कन चार्जर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या केरॉन पोलार्डने १८९ सामन्यात १०३ झेल घेतले आहेत. २०२२ नंतर त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली.

सुरेश रैना IPL मध्ये १०० झेल घेणारा पहिला क्षेत्ररक्षक होता. २०२१ मध्ये शेवटचा सामना खेळणाऱ्या रैनाने २०५ सामन्यात १०९ झेल घेतले.

विराट कोहलीने २४२ सामन्यात ११० झेल घेतले आहेत. विराटने २००८ मध्ये आरसीबीकडून पदार्पण केले आणि अजूनही तो त्याच संघाचा भाग आहे.

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels