IPL चा सर्वात वेगवान चेंडू कोणी टाकला?

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 31, 2024

Hindustan Times
Marathi

PL २०२४ मध्ये (३० मार्च) लखनौ आणि पंजाब यांच्यात सामना झाला. या सामन्यात लखनौने २१ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यातून मयंक यादवने आयपीएल पदार्पण केले. मयंक प्रथम श्रेणी क्रिकेट दिल्लीकडून खेळतो.

आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच मयंकने यंदाच्या आयपीएलचा सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.

मयंक यादवने पंजाब किंग्जविरुद्ध १५५.८ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. आयपीएलच्या इतिहासातील हा पाचवा सर्वात वेगवान चेंडू आहे.

शॉन टेट - आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटच्या नावावर आहे. टेटने १५७.७१ च्या स्पीडने चेंडू टाकला होता. 

लॉकी फर्ग्युसन - न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ताशी १५७.३ किमी वेगाने चेंडू टाकला होता.

उमरान मलिक  - भारताच्या उमरान मलिकने ताशी १५७ किमी वेगाने चेंडू टाकला आहे. IPL चा हा तिसरा वेगवान चेंडू आहे.

एनरिक नॉर्खिया- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाने १५६.२२ च्या स्पीडने चेंडू टाकला होता. तो चौथ्या क्रमांकावर आहे.

मयंक यादव- आता या यादीत मयंक यादव आला आहे. मयंक यादवने १५५.८ च्या स्पीडने चेंडू टाकला. 

तुम्ही दिवसभरात किती चालता? जाणून घ्या फायदे