क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये क्रिकेट चाहते मोठ्या संख्येत आहे.
महिला क्रिकेटपटू पुरुष क्रिकेटपटू इतकीच लोकप्रिय आहेत आणि त्यांची कमाईही खूप जास्त आहे.
जगातील टॉप ५ सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू कोण आहेत, हे जाणून घेऊयात. ही माहिती प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर आधारित आहे.
एलिस पेरी : ऑस्ट्रेलिया आणि आरसीबीची खेळाडू पेरीची संपत्ती जवळपास १२१ कोटी रुपये आहे. फिफा विश्वचषक आणि क्रिकेट विश्वचषक या दोन्ही स्पर्धांमध्ये ती खेळली आहे.
मेग लॅनिंग: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मेग लॅनिंगची संपत्ती ७५ कोटी रुपये आहे. ती ऑस्ट्रेलियन संघाची यशस्वी कर्णधार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची संपत्ती ४२ कोटी रुपये आहे.
भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाची संपत्ती सुमारे ३४ कोटी रुपये आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची संपत्ती सुमारे २६ कोटी रुपये आहे.