भाजीत मीठ जास्त झालं? 'या' टिप्सनी होईल कमी! 

By Harshada Bhirvandekar
Jan 07, 2025

Hindustan Times
Marathi

भाजीत मीठ कमी पडले, तर परत घालता येते. मात्र, जास्त झाले तर भाजीची चव खराब होते.

भाजी बनवताना त्यात चुकून मीठ जास्त पडले, तर टेंशन घेऊ नका. 'या' टिप्स कामी येऊ शकतात. 

आज आम्ही तुम्हाला भाजीत जास्त झालेले मीठ कमी करण्याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.

भाजीत मसाला, किंवा मीठ जास्त झाले तर, त्यात थोडा लिंबाचा रस घालू शकता.

ग्रेव्ही भाज्यांमध्ये दही घालून त्यातील जास्तीचे मीठ कमी करता येते.

पनीर, दाल मखनी किंवा राजमा सारख्या भाज्यांमध्ये मीठ जास्त झाले तर त्यात क्रीम घालू शकता.

एखाद्या भाजीत मीठ जास्त झाले तर त्यात बटाट्याच्या फोडी घाला. यामुळे मीठ कमी होईल.

भाजीत मीठ जास्त झाले तर, त्यात कणकेचे ३-४ गोळे घालून शिजू द्या. नंतर ही गोळे भाजीतून काढून टाका. 

रस्सेदार भाज्यांमध्ये थोडेसे पाणी घालून त्यातील मीठाचे प्रमाण संतुलित करू शकता.

भाजीत मसाला घातल्यानंतर मीठ घालण्याऐवजी भाजी शिजवताना मीठ घाला.

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री