'या' राशींसाठी आजचा दिवस आर्थिक घडी बसवणारा

By Priyanka Chetan Mali
Apr 01, 2024

Hindustan Times
Marathi

आज १ एप्रिल सोमवार रोजी चंद्र धनु राशीत भ्रमण करत आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलाचा या ४ राशींना लाभ होईल.

मेष: आज समाजात मान मिळेल. लांबचे प्रवास आनंददायक होतील. प्रसिद्धीही मिळेल. वातावरण आनंददायक राहील.

कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल.

सिंह: आज बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल.

आज केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल.गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील.

मकर: आजचं दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. आर्थिक घडी बसेल. कलावंतांना उत्तम संधी व प्रसिद्धी मिळेल.

व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. 

कुंभ: आज उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. 

स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. 

परी हु मैं! काजल अग्रवालचा अवतार पाहिला का?