फ्रीजमध्ये अन्न जास्त काळ ताजे राहण्यासाठी टिप्स

By Hiral Shriram Gawande
Feb 26, 2024

Hindustan Times
Marathi

नाशवंत अन्न फ्रीजमध्ये लीक-प्रूफ कंटेनरमध्ये ठेवा किंवा झाकण घट्ट बंद करा.  

खूप गरम अन्न थंड होऊ द्या आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. 

प्रत्येक गोष्ट वेगळी ठेवा, मग ती फळे असो वा भाज्या. कापलेली फळे आणि भाज्या उघड्या ठेवू नका.

सडलेल्या भाज्या आणि फळे आधी फ्रीजमधून काढून टाका. इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होणार नाही याची खात्री करा.

दीर्घकाळ वीज खंडित होत असताना ४ तासांच्या आत फ्रीजमधील शक्य तितके अन्न वापरा.

फ्रीजमधील जुने पदार्थ नेहमी आधी वापरा. ताजे त्याच्यानंतर वापरा.

फ्रीजमध्ये कोणताही पदार्थ उघडे ठेवू नका, सर्व नीट झाकून ठेवा. 

वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या हे शाकाहारी पदार्थ

Photo Credits: Unsplash