कुकरचे पिवळे डाग काढण्यासाठी टिप्स

pixabay

By Hiral Shriram Gawande
Jul 30, 2024

Hindustan Times
Marathi

कुकर साफ करणे कठीण असते. विशेषतः झाकणाच्या रचनेमुळे अन्नाचे कण इकडे तिकडे चिकटून राहतात.  झाकणाच्या आतील भागावर डाळ आणि भाज्यांचा पिवळा रंग असतो. ते काढण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.

pixabay

जर तुमच्या कुकरचे झाकण पिवळे आणि घाण झाले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

pixabay

ॲल्युमिनियम फॉइलने स्वच्छ करा

pixabay

कुकरच्या झाकणांवरचे पिवळे डाग साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि टूथपेस्टची पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट कुकरच्या झाकणाच्या आतील भागांवर लावा. नंतर ॲल्युमिनियम फॉइलने झाकण घासा. सर्व डाग साफ होतील.

pixabay

व्हिनेगरच्या द्रावणात भिजवा

pixabay

एका खोलगट पातेल्यात पाणी गरम करून त्यात व्हिनेगर टाका. आता त्यात कुकरचे झाकण अर्धा तास भिजवा. नंतर शिट्टी आणि रबर काढा आणि ब्रश आणि स्क्रबने पूर्णपणे स्वच्छ करा.

pixabay

लिंबूने स्वच्छ करा

pixabay

कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाका आणि त्यात दोन किंवा तीन लिंबाच्या फोडी घाला. नंतर झाकण बंद करून उकळू द्या. यामुळे कुकर आणि झाकणावरील घाण साफ होईल. पाणी काढून टाका आणि लिक्विड डिशवॉशने घासून घ्या. कुकरमधील सर्व पिवळे डाग निघून जातील.

pixabay

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान