घरात फ्रेश लोणी काढण्यासाठी टिप्स! 

By Aiman Jahangir Desai
Jan 14, 2025

Hindustan Times
Marathi

सकाळी किंवा रात्री साई लंच बॉक्स किंवा कंटेनरमध्ये ठेवावी. हा बॉक्स फ्रीजरमध्ये ठेवा. जेव्हा हे बॉक्स १५ दिवसांनी भरले जाईल तेव्हा ते बाहेर काढून त्यातून लोणी बनवा.

फ्रिजमधून थोडावेळ बाहेर ठेऊन नंतर ते सतत ३-४ मिनिटे फेटत राहा.  आता अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हळद घाला आणि नंतर मिक्स करा.

साई चांगली फेटल्यावर, फ्रिजमधून अर्धा किंवा एक ग्लास थंड पाणी घाला आणि पुन्हा सुमारे १ मिनिट फेटून घ्या.

आता लोणी काळजीपूर्वक काढा आणि एका मोठ्या भांड्यात ठेवा. हे पाणी गाळून घ्या आणि लोणी थंड पाण्याने चांगले धुवा.

आता बटर पेपर कापून तो चौकोनी ट्रे किंवा बॉक्समध्ये ठेवा आणि त्यात लोणी व्यवस्थित ठेवा.

माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी