२०२४ मध्ये 'या' कारची सर्वाधिक विक्री!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 05, 2025

Hindustan Times
Marathi

पारंपारिकरित्या मारुती सुझुकी मॉडेल्सचे वर्चस्व असलेल्या यादीमध्ये, टाटा पंच एसयूव्ही प्रथमच अव्वल स्थानावर आली आहे - कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये भारतातील सर्वात जास्त विकले जाणारे प्रवासी वाहन होण्याचा मुकुट मिळविला आहे.

टाटा पंच ही २०२४ मध्ये भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार होती. सब-फोर मीटर एसयूव्हीने गेल्या वर्षी 202,030 युनिट्सची विक्री केली होती. हा नंबर पंच आणि पंच ईव्हीच्या सर्व व्हेरियंटला एकत्र करतो. 

विशेष म्हणजे भारतातील बेस्टसेलिंग पॅसेंजर व्हेइकल होण्याच्या मार्गावर टाटा पंचने चार मीटर च्या एसयूव्हीपेक्षा मोठ्या आणि चांगल्या अशा काही मॉडेल्सना मागे टाकले आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर २०२४ मध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाची बेस्टसेलर कार ठरली आहे. गेल्या वर्षी टॉलबॉय हॅचबॅकची १,९०,८५५ युनिट्सची विक्री झाली होती.

वॅगनआर हे गेल्या वर्षी देशातील सर्वात जास्त विकले जाणारे मॉडेल होते. 

मारुती सुझुकी अर्टिगा गेल्या वर्षी भारतात तिसरी बेस्टसेलिंग कार ठरली होती.

गेल्या वर्षी अर्टिगाची १,९०,०९१ युनिट्सची विक्री झाली होती.

2024 मध्ये 1,88,160 युनिट्ससह भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी कार बनली. 

2024 मध्ये 1,86,619 युनिट्ससह ह्युंदाई क्रेटा भारतातील पाचव्या क्रमांकाची बेस्टसेलिंग कार ठरली. 

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!