सिट्रॉन बेसॉल्ट झाली महाग, जाणून घ्या नवी किंमत!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 06, 2025

Hindustan Times
Marathi

सिट्रॉन बेसॉल्ट कूप एसयूव्ही ची विक्री गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतात ७.९९ लाख रुपये झाली होती.

फ्रेंच वाहन निर्मात्या कंपनीने आता नवीन वर्षासाठी आपल्या रेंज मॉडेलच्या किंमती वाढवल्या आहेत.

 सुरुवातीचा कालावधी संपल्याने सिट्रॉन बेसॉल्ट आता किरकोळ महाग झाला असून किंमती २८,००० रुपयांपर्यंत गेल्या आहेत.

नवीन बेसॉल्ट कूप एसयूव्हीची किंमत आता ८.२५ लाख रुपयांपासून १४ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.

सिट्रॉन बेसॉल्टच्या बेस व्हेरियंटच्या १.२ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल यू मॅन्युअल व्हेरियंटच्या किंमतीत २६,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

१.२ लीटर टर्बो पेट्रोल मॅक्स व्हेरिएंट आता मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकवर २१००० रुपयांनी महाग झाला आहे.

दरम्यान, टर्बो पेट्रोल मॅक्स व्हेरियंट १७ हजार रुपयांनी महाग झाले आहेत.

सिट्रोएन बेसॉल्ट १.२ लीटर टर्बो पेट्रोल प्लस मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक वर २८,००० रुपयांची वाढ करून टॉप-स्पेक ट्रिम्सवर सर्वात महाग आहे.

बेसॉल्ट १.२ लीटर एनए पेट्रोल मॅन्युअलची किंमत ९.९९ लाख रुपयांवर कायम आहे.

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री